E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जिल्ह्यातील चार तालुक्यात विक्रमी पाऊस
Samruddhi Dhayagude
27 May 2025
बारामतीमध्ये गेल्या ५० वर्षांत सर्वांधिक पाऊस
पुणे : जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर या ४ तालुक्यांत गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस पडला आहे. विशेषत: बारामती तालुक्यात गेल्या ५० वर्षांत पडला नाही, एवढा पाऊस रविवारी (२५ मे) पडला आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांना या पावसाचा फटका बसला आहे.
इंदापूर तालुक्यातील ७२ तर बारामती तालुक्यांतील ७१ अशा एकूण १४३ घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच २५ घरांची पडझड झाली आहे. खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरण येथे एका मच्छिमारावर वीज कोसळून तर दौंड येथे ज्येष्ठ महिलेची भिंत पडून मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील एका घरात पाणी शिरल्याने ७ जण अडकले होते. या सर्वांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरुपपणे बाहेर काढले, तसेच नारोळी (बारामती) गावातील एक गाय मृत्यूमुखी पडली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव मोहीम राबवत बारामती व इंदापूर तालुक्यातील १४३ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने स्वतंत्र चर काढून पाणी बाहेर काढण्यात आले, तर इंदापूर तालुक्यातील तावशी येथील जाधव वस्तीतील एका घराला पाण्याने वेढा दिल्याने तेथे एक व्यक्ती आणि जनावरे अडकली होती. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.
बारामती तालुक्यातील जळोची येथे ओढ्याचा अंदाज न आल्याने दिपेश सिंग (वय ३३) दुचाकीसह वाहून गेला; मात्र नदीपात्रात अडकून राहिल्याने तो वाचला. बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी त्याला बाहेर काढले.
इंदापूर तालुक्यातील जांब येथे नीरा नदीवरील बंधार्याचे काम करण्यासाठी २ मजूर पोकलेनसह नदीत अडकले होते. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे.जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २१ मंडळामध्ये गेल्या २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बारामती अणि सणसर येथे तर विक्रमी १९४.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीस
मागील ८ दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी आणि दररोज मोलमजुरी करणारे शेतमजूर मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे येरे येरे पावसा या ऐवजी जारे जारे पावसा अशी विनवणी होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील कमी पावसाच्या तालुक्यात मागील ८ दिवसांपासून पाऊत होत असल्याने वार्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील २१ मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद
बारामती शहर परिसर -१९४.८ मि.मी., सणसर - १९४.८ मिमी, न्हावरा - ११४.३ मिमी, लोणावळा - १७४ मिमी, पारगांव - ११४.३ मिमी, कुसगांव - १७४ मिमी, निमोणे - ११४.३ मिमी, कार्ला - १७१.५ मिमी, माळेगाव - १०८.३ मिमी, टाकवे बुद्रुक - १७१.५ मिमी, राजूर - ७७ मिमी, खडकाळा - १७१.५ मिमी, आपटाळे - ७७ मिमी, भिगवण - १३६.३ मिमी, देऊळगाव - ७३.५ मिमी, कुंभारवळण - ६५ मिमी, पणदरे - ७०३ मिमी, माले - ६५ मिमी, वडगाव रासाई - ७७.३ मिमी, नारायणगाव - ६४.८ मिमी, राहू ६५.८ मिमी.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत सरासरी पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलीमीटरमध्ये)
मावळ - ९६.५, बारामती - ७७, दौंड - ६४, शिरुर - ६०.५, इंदापूर - ५६.१, जुन्नर - ५३.९, खेड - ४४.७, मुळशी - ४३.९, पुरंदर - ४३.६, हवेली - ३५.८, आंबेगाव - ३०.५, वेल्हे - २६.९, भोर - २४.३, पुणे शहर - २१.३ आदि १४ तालुक्यांत गेल्या २४ तासांत सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक ९६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्याची पावसाची सरासरी ५३.३ मिमी नोंद झाली आहे.
Related
Articles
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर